महसूलमंत्र्यांची माजी मुख्यमंत्र्यांवर टीका

Published on -

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका करणे चांगलेच महागात पडली आहे. फडणवीस यांच्या या बौद्धिकतेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. देश रसातळाला गेला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

याबाबत बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, ‘फडणवीस यांची प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. अर्थव्यवस्था रसातळाला जाणे म्हणजे काय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दाखवून दिले आहे.

डॉ. मनमोहन सिंह बोलतात तेव्हा संपूर्ण जग ऐकते, अशी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष यांची प्रतिक्रिया आहे. अशा नेत्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलणे म्हणजे त्यांच्या बौद्धिकतेची किव वाटते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!