गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले आमदार डॉ. किरण लहामटे वाचा सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याची फिर्याद खडकी बुद्रूक येथील ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई रामदास लखा बांडे यांनी शुक्रवारी राजूर पोलिस ठाण्यात नोंदवली.

पायी जात असताना गाडी कट मारून गेली यावेळी गाडी हळू चालवा,असे ओरडून सांगितल्याने आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ग्रामपंचायत शिपायास मारहाण केली

अशी तक्रार राजूर पोलीस ठाण्यात खडकी बुद्रुक ग्रामपंचायतीचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी दाखल केली आहे . याप्रकरणी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुरुवारी दुपारी लव्हाळीला चाललो होतो. खडकीत ही व्यक्ती माझ्या वाहनाला आडवी आली. ती व्यक्ती दारू पिली होती मात्र आडवे येऊनही त्यांनी अर्वाच्च भाषेत मला शिवीगाळ केली.

मी वाहनातून उतरून त्याच्यावर रागावलो. ‘ आता तरी सुधरा’ अशी कडक समज देत मी निघून गेलो. मात्र एका दारू पिणाऱ्याची बाजू घेऊन जर कोणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment