नगर-मनमाड महामार्ग दुरवस्थेच्या निषेधार्थ तरुणांचे ‘हे’ अनोखे आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे असे मत प्रवासी व्यक्त करतात.

असे असले तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे सातत्याने कानाडोळा करीत आहेत. काल सकाळी रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर

उतरून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका केली.रोडवर पडलेल्या खड्ड्यात युवकांनी आपले डोक्याचे केस काढून मुंडण आंदोलन केले.

या तरुणांच्या आंदोलनास क्रांतिसेना पक्ष, मराठा एकीकरण समिती, मनसे राहुरी फॅक्टरी, संघर्ष चालक मालक संस्था, स्वराज्य चालक मालक संघटना,

प्रहार चालक मालक संघटना, छावा संघटना, नाभिक संघटना राहुरी फॅक्टरी, वाहन चालक सामाजिक संघ, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान , इतर सामाजिक संघटना यांनी सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment