त्या सराईत गुन्हेगारांकडून 18 गावठी पिस्तुलं जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-18 गावठी पिस्टल व 27 जिवंत काडतूसे जवळ बाळगणा-या सहा जणांना हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पुण्यात ही शस्त्रे येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली. या सहा जणांना पोलिसांकडून अटक अरबाज खान,

सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी पकडलेल्या 6 आरोपींपकी 4 आरोपी हे शिरूर परिसरातले आहेत. अटकेतील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या पूर्वी त्यांच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरात पिस्तुल तस्करीचे,

तसेच मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्यांचा मध्यप्रदेश राज्याचे पिस्तुल तस्करीच्या साखळी बाबत काही कनेक्शन आहेत का याबाबत अधिक तपास करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment