धक्कादायक! महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे.

आता पुन्हा एकदा राजस्थानच्या अलवरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. माहेरावरून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून या नराधमांनी याचा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी : अलवर जिल्ह्यातील तिजारा येथे ही घटना घडली. १४ तारखेला ही घटना घडली असून, १७ तारखेला महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

महिला ही आपल्या माहेरी भावाकडे पैसे देण्यासाठी गेली होती. परत येत असताना, सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्यांना पाहिले. शस्त्रांचा धाक दाखवला. त्यानंतर भाच्याला बांधून ठेवले.

त्यानंतर त्यातील काही तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार इतर साथीदारांनी मोबाइल कॅमेऱ्यात शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment