अहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पारनेर पंचायत समितीच्या ३५ वर्षीय प्रशांत आहिरे या तरूण व होतकरू ग्रामसेवकाचे आज (मंगळवारी) सकाळी साडेआठ वाजता पुण्यात खासगी रूग्णालयात दुर्देवी निधन  झाले. 

अत्यंत मितभाषी व कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्वाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने पारनेर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आहिरे यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यांचा अधिक त्रास जाणवू लागल्याने नगरच्या खासगी रूग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता.

दरम्याच्या काळात दुर्देवाने त्यांच्या पत्नी निलम कांबळे यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांनाही नगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल  करण्यात आले.

प्रशांत आहिरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वाघोली, पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होउ लागली होती.

मात्र त्यांना व्हेंटीलेटरची आवष्यकता भासू लागल्याने पुणे शहरात कोठेही व्हेंटीलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नव्हते. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय गवळी यांनी आ. नीलेश लंके यांच्यामार्फत प्रयत्न करूनही प्रयत्नांना यश आले नाही.

गवळी यांनी संपर्कातील पुणे येथील सुमारे ३० डॉक्टरांशी संपर्क केला. तरीही व्हेंटीलेटर उपलब्ध होउ शकले नाही. आहिरे यांना व्हेंटीलेटर उपलब्ध झाले असते तर या उमद्या तरूणाचे प्राण वाचू शकले असते. प्रयत्न करूनही व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने मंगळवारी सकाळी आहिरे यांचा मृत्यूू झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment