‘त्या’ने केली मुळा नदीपात्रात आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या मुळा नदीवरील पुलावरून एका अज्ञात तरुणाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल (सोमवार) घडली.

घटनेची माहिती समजताच  राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नावघाट परिसरात उडी मारलेल्या त्या तरुणाचा शोध घेतला.

गणपती घाट परिसरातही शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या तरुणाचा शोध घेऊनही त्याचा तपास लागला नव्हता. काल सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान

राहुरी शहरहद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवर असलेल्या मोठ्या पुलावर एक 35 ते 40 वयोगटातील तरुण आला.

यावेळी त्याने अंगावरील कपडे काढले. तसेच त्याच्याजवळ असलेली बॅग व चप्पल पुलावर ठेवून खाली मुळा नदीपात्रात उडी मारली.

सुमारे पन्नास फूट अंतरापर्यंत तो गटांगळ्या खात जाताना दिसला. त्यापुढे तो नदीपात्रात दिसेनासा झाला. अशी माहिती जुन्या पुलाजवळ पोहत असलेल्या काही तरुणांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment