Corona Virus Marathi News

मोठी बातमी: आयोडीन करतंय केवळ 15 सेकंदात कोरोनाचा नाश; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

मात्र ज्या नाकातोंडावाटे कोरोना शरीराच्या आत प्रवेश करतो आहे, तिथंच त्याचा नाश होऊ शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. नाका-तोंडात कोरोनाव्हायरसचा नाश करता येऊ शकतं आणि तेदेखील आयोडिनने असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे.

आयोडिनने नाक आणि तोंड स्वच्छ केल्यास कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची शक्यता कमी होते, संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. असं युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनने केलेल्या संशोधनात दिसून आलं आहे. शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये कोरोनाव्हायरसच्या नमुन्यावर अँटिसेप्टीक पोविडोन-आयोडिन (पीव्हीपी- I) चं सोल्युशन टाकलं.

0.5%, 1.25%,  2.5% अशा वेगवेगळ्या प्रमाणातील आयोडिनचं सोल्युशन त्यांनी कोरोनाव्हायरसवर वापरून पाहिलं. तिन्ही प्रमाणातील सोल्युशनचा परिणाम चांगला पाहायला मिळाला. 0.5 टक्के प्रमाणातच कोरोनाव्हायरस फक्त 15 सेकंदात निष्क्रिय झाला, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

दरम्यान,   वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता जगभरात लोक लस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसे संशोधनही जगभर सुरु आहे. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे. यात  ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच  येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button