कांदा चाळीसाठी कोटींचे अनुदान; खासदार विखेंनी दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  निर्यातबंदी नंतरही कांद्याला चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी अजून एक सुखद वृत्त समोर येत आहे. सन 2019-20 या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी 45 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे,

अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे़ कांदा उत्पादक शेतकºयांना काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.

या योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. परंतु, विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते़ हे अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे,

यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते़ या प्रयत्नांना यश आले असून, जिल्ह्यातील 168 शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे,असे विखे यांनी पत्रकात नमूद केले आहे़

दरम्यान या 168 लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये जामखेड- 5, कर्जत- 37, राहुरी-20, शेवगाव-38, श्रीगोंदा-46, अकोले-12, संगमनेर- 5 असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment