राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करा – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- राज्‍यात सातत्‍याने सुरु असलेल्‍या पावसामुळे पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून, शेतक-यांना मदत मिळवी म्‍हणून नुकसान भरपाईच्‍या निकषात बदल करावेत आणि राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करावा अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्‍याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना दिलेल्‍या निवेदनात आ.विखे पाटील म्‍हटले आहे की, सद्य परिस्थितीत राज्‍यात सातत्‍याने संततधार पाऊस सुरु आहे.

बहुतांशी तलाव, लघु, मध्‍यम व मोठे प्रकल्‍प पुर्ण क्षमतेने वाहत असुन, ओढे, नाले व नद्यांना आलेल्‍या पुराचे पाणी शेतक-यांच्‍या शेतामध्‍ये आल्‍याने हाताशी आलेली खरीपाची पिके जमीनदोस्‍त झाली आहेत.

एकाच दिवसात ६५ मिलीमिटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई देण्‍याचे शासनाचे धोरण आहे. परंतू राज्‍यात झालेल्‍या पावसाची आकडेवारी ही शासनाच्‍या मदतीच्‍या निकषा पलिकडे गेली असल्‍याची बाब

आ.विखे पाटील यांनी मंत्र्यांच्‍यानिदर्शनास आणून दिली आहे. यावर्षी मान्‍सुन वेळेवर सुरु झाल्‍याने कोवीडचा प्रादुर्भाव असल्‍याने राज्‍यातील शेतक-यांनी खरीप हंगाम यशस्‍वी करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात कष्‍ट घेतले.

बाजरी, सोयाबीन, कडधान्‍य, मका, कांदा इत्‍यादी पिकांची करण्‍यात आलेली पेरणी चांगल्‍या पध्‍दतीने होवून पिकही काढणीसाठी आलेली होती.

मात्र सततच्‍या पावसामुळे हाताशी आलेली पिक जमिनदोस्‍त झाल्‍याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यापुर्वी बोगस बियाणांमुळे झालेली फसवणूक,

शेतक-यांवर आलेले दुबार पेरणीचे संकट आणि आता नैसर्गिक आपत्‍ती यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, राज्‍य सरकारकडुन शेतक-यांना मदतीची अपेक्षा आहे.

मात्र पंचनाम्‍याच्‍या निकषात बदल केल्‍याशिवाय शेतक-यांच्‍या पदरात ही मदत पडणार नसल्‍याने विशेष बाब म्‍हणून नुकसान भरपाईच्‍या निकषात बदल करुन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करावा अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment