मनसेच्या पदधिकऱ्याची महापौरांवर टीकास्त्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  शहरातील खड्डे नागरी समस्यां यांसह अनेक विषयांमुळे शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे हे सध्या चर्चेत आहे. दरम्यान मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतेच महापौरांवर टीका केली आहे.

आयुक्त व महापौर यांच्या ढिसाळ कारभारा मुळे बाळासाहेब देशपांडे मध्ये बाळंतपणासाठी हजारो रुपये खर्च येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये गरोदर मातांना बाळंतपणा साठी 3000 ते 5000 रुपये खर्च येत आहे. शहरातील गोरगरीब सर्व सामान्य जनतेला मोफत सेवा मिळावी या करीता हे हॉस्पिटल सुरु झाले.

मात्र हॉस्पिटलचा सुरु असलेला ढिसाळ कारभारामुळे मनसेचे नितीन भुतारे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये लॅबॉरेटरी, रक्तपेढी बंद आहे.

तसेच हॉस्पिटल मध्ये औषध पुरवठा होत नसल्यामुळे रुगणांनाच हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. तसेच नादुरुस्त उपकरणाअभावी आवश्यक अनेक तपासण्या होत नसल्याने रुगणांना मोठा आर्थिक भर सहन करावा लागतो आहे.

ह्या सर्व समस्यां मनसेचे जिल्हाध्यक्ष्य सचिन डफळ व मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले.

अनेक वेळा महापौरांनी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला भेट दिली परंतु परिस्थिती जैशी तिचं आहे. या प्रश्नाबाबत नगरसेवक गप्प आहे. या सर्व प्रकरणला आयुक्त व महापौर जबाबदार आहेत.

यांच्यासह अहमदनगर मनपातील 68 नगरसेवकांच्या यांचा ढिसाळ कारभार जबाबदार आहेत. त्यामुळे आता आम्ही कोणाच्या तोंडाला काळे फासू असा सवाल मनसेच्या वतीने नितीन भुतारे यानी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment