या तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-खरवंडी कासार ग्रामपंचायतची कर वसुली करणारा कर्मचारी कोरोनो पॉझीटीव्ह असल्याची माहीती असुनही खरवंडी कासार ग्रामपंचायतचे प्रशासक यांनी कोरोनो पॉझीटिव्ह कर्मचाऱ्याला हाती असलेल्या कर वसुली रकमेचा भरणा करावा.

अन्यथा आपणावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशी नोटीस पाठवत त्रास देण्याची घटना खरवंडी कासार येथे घडली . याबाबत वृत्त असे की खरवंडी कासार ग्रामपंचायत च्या अतिक्रमणीत जागेची जागा भाडे कर वसुली चालु असून,

या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानी गावात फिरून कर वसुली केली. बॅकेच्या वेळेत भरणा केला बँक बंद झाल्यावर आलेला कर वसुलीचा भरणा कर्मचाऱ्याकडे हाती

शिल्लक राहीला व तो कर्मचारी त्या दिवशी कोरोनो पॉझीटिव्ह रूग्णाच्या संपर्कात झाला. त्याला ही थंडी तापाचा त्रास झाल्याने त्या कर्मचाऱ्याने कोव्हीडची तपासणी केली असता तो पॉझीटिव्ह आला,

त्याने ग्रामसेवक व प्रशासक यांना कल्पना दिली असता. हॉस्पीटलमध्ये चागले उपचार घ्या असे सागंण्याऐवजी भरणा करा असे सांगीतले, त्या कर्मचाऱ्याने सघंटनेच्या पदाधीकाऱ्याना हि बाब सांगितले.

त्यामुळे सदर कर्मचाऱ्याचा राहनीमान भत्ता देण्या सदंर्भात सघंटनेने ग्रामपंचायतला रितसर नोटीस दिली. याचा राग धरून प्रशासकाने पुन्हा कोरोनो पॉझीटिव्ह कर्मचाऱ्यास भरणा करा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment