मराठा आरक्षणाचे धग ; संगमनेरात ‘रास्ता रोको’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.

परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाची धग दिसून आली.

बुधवारी सकाळी 10.30 वाजता संगमनेर बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून

स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे, चालू शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत भरतीसंदर्भात ज्या जाहिराती निघालेल्या होत्या;

तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू होत्या त्या ‘एसईबीसी’ प्रमाणेच झाल्या पाहिजे, नोकरभरती झालेल्यांना सामावून घ्यावे, सारथी या संस्थेचे पुनर्जीवन होऊन त्याला भरघोस निधी मिळालाच पाहिजे अशा मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या.

आंदोलनादरम्यान, यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, निर्मलाताई गुंजाळ, अविनाथ थोरात, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, प्रशांत वामन, अशोक सातपुते, किरण घोटेकर, डॉ. महेंद्र कोल्हे आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment