राहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्यात आजही असे काही गावे आहे जिथे आजही मोबाईल इंटरनेट टॉवर नाही. ज्यामुळे संपर्क करण्यास अडचण निर्माण होते.

मात्र राहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र विजेविना ते नेहमीच आऊट ऑफ रेंज राहते. राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण आणि म्हैसगांव ही गावे कायमच बीएसएनएल.

च्या रेंजबाहेर आहेत. येथील भारत संचार निगम लिमिटेडचे टॉवर फक्त नावालाच उभे आहे. या टाँवरची सेवा नेहमीच खंडित असते.

बीएसएनएल टॉवरची बँटरी खराब असल्याने वीज पुरवठा सुरू असेल तरच या टॉवरची सेवा उपलब्ध असते आणि वीज बंद झाल्यावर टॉवरची सेवा खंडित होते. येथे एक जनरेटर आहे मात्र ते पण नादुरुस्त आहे.

याठिकाणी भारत संचारचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी येत नाही. आले तर उडवाउडवीची उतरे देतात आणि फोन बंद करतात. या क्षेत्रातील संपूर्ण जनता या सेवेपासून वंचित आहे.

शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि शासकीय अधिकारी यांना आँनलाइन कामात व्यत्यय येतो. त्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

जर ही सेवा सुरळीत होत नसेल तर ती बंद करण्यात यावी किंवा बीएसएनएल.सेवेचा लाभ घेता येईल, यासाठी खंडित झालेली ही सेवा सुरळीतपणे सुरु करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment