दिवंगत शिवसेना नेते अनिल भैयांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- नगर शहरात शिवसेनेची खरी ओळख करू देणारे व शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे.

अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे रविवार (दि.२७ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ही सभा होईल.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लाईव्ह सभेला संबोधित करणार आहेत . कोरोना काळात शासनाचे सर्व नियम पाळून ही सभा होणार आहे.

राज्यातील नेते मंडळी, मंत्री महोदय तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या सभेत धर्मवीर अनिल भैय्या यांच्या जीवनावर आधारित एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment