ती आंदोलने म्हणजे मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर नगर शहारामध्ये सर्वच राजकीय पक्ष खड्ड्याबाबत आंदोलन करत आहेत या वरून सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची आहे

हेच कळत नाही सध्या जे चालले हे सर्व नौटंकी आहे म्हणजेच मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर बाकी दुसरे काही नाही ज्यांच्या हातात सत्ता आहे ते ही आंदोलन करतात याचा अर्थ प्रशासन यांना जुमानत नाही किंवा यांनी प्रशासनासमोर नांग्या टकले असे दिसून येतेय.

दर वर्षी लाखो करोडो रुपये रस्त्यासाठी खर्च करूनही रस्ते खराब का होतात हे एक जादुई आश्चर्य आहे. रस्ते ठेकेदार बनवतो पण त्या रस्त्यासाठी जे टेंडर मंजूर होते ती रक्कम खरोखरच खर्च केली जाती का, जर नाही केली जात तर ठेकेदाराला जाब कोणी विचारायचे. कारण जाब विचाराची हिम्मत ना प्रशासनात आहे

ना सत्ताधाऱ्यांत सर्वचजण या मध्ये बरबटलेले आहेत हे कोणी सांगायची गरज नाही. खरोखरच नगर शहर सुधारावे हे राजकीय पक्षांना वाटत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन समोरासमोर बसून आराखडा तयार करून आपल्या पक्षाचे ध्येय बाजूला ठेवून काम करायला हवे. सध्या नगर शहराची अवस्था अशी झाली की, आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय.

कोणाला काही घेणे राहिले नाही फक्त ज्याला त्याला आपला स्वार्थ पडलाय. व काही लोकप्रतिनिधी आहेत की जे खरच काम करतात पण ते सध्या प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसत आहे. महापालिकेच्या सत्ताधाऱ्याना अधीकाऱ्यांना काळे फासण्याची वेळ का आली याचा अर्थ प्रशासन तुम्हाला जुमानत नाही व प्रशासनावर तुमचा वाचक नाही.

या साठी अधिकाऱ्यांवर वचक बसेल असे काम करण्याची गरज आहे. पाणी कुठे मुरते हे सर्वांना माहिती आहे त्या पेक्षा पाणी मुरु न देता नगर शहराचा विकास कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. सध्या सत्तेत असलेले व नसलेले सारखेच वाटत आहेत कोणी कोणाला काळे फासू नका, काळे फासून काही साध्य होणार नाही, त्या पेक्षा प्रशासनाला विश्वासात घ्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment