कृषी विधेयकांबाबत महसूल मंत्र्यांचे मोठे विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकांच्या मुद्यावरून केंद्र सरकार विरोधात विरोधक एकटावले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत.

याचवेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या वादग्रस्त कृषी विधेयकांची अंमलबजावणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी घोषणा केली. कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक,

शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार व कृषि सेवा विधेयक ही विधेयके लोकसभेत आणि राज्यसभेची मोहोर उमटली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले :

“संसदेत संमत करण्यात आलेल्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार या विधेयकांच्या विरोधात आहे. त्यामुळे या विधेयकांची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment