या तालुक्यात कोरोना सुसाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे.

त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत.

त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते आहे. अकोल्यात दरदिवशी अर्धशकतकाच्या जवळची आकडेवारी पहायला मिळत आहे. तसेही जीतके स्वॅब वाढतील तितकी चांगली गोष्ट आहे.

करण, नंतर अशीच रुग्णसंख्या घटण्यास मदत होणार आहे. दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार आज अकोले तालुक्यात 43 रुग्णांची भर पडली आहे.

एकीकडे कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असली तरी कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या देखील साथ देत आहे. तालुक्यात आज 43 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर आजच 46 जण कोरोनामुक्त झाले आहे. हि एक दिलासादायक बाब आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment