खा. विखेंच्या गावात शेतकऱ्यांचं आंदोलन; घराकडे जाण्यास पोलिसांचा मज्जाव, आंदोलनकर्त्यांनी केले ‘असे’ काही ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटना बुधवारी खासदारांच्या घरासमोर ”राख रांगोळी” आंदोलन करणार असल्याच इशारा आधीच संघटनांनी दिलेला होता.

शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा दिला गेला होता. त्यानुसार शेतकरी संघटनेने लोणी या खासदार डॉ. सुजय विखे यांच्या गावात राख रांगोळी आंदोलन केले.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे आंदोलक सुजय विखे यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना घराकडे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर राखरांगोळी आंदोलन केले.

शेतकर्‍यांनी निवडुन देलेले खासदार जर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभेत आवाज उठवणार नसतील , तर शेतकरी त्यांना पुन्हा निवडुन देणार नाहीत. जो पक्ष कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल व जो पक्ष कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी करेल, अशा पक्षांना शेतकर्‍यांनी या पुढे मतदान करू नये , असे आवाहन घनवट यांनी यावेळी केले.

या आंदोलनात उत्तर नगरचे संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब आढाव, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, अनिल भुजबळ आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले , ”सहा महिने ‍शेतकर्‍यांनी कांदा मातीमोल भावाने विकला.

आता कुठे किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले तर केंद्राने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संकटात असताना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला अशा पद्धतीने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.”

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment