कोरोना योद्धाच आता कोरोनाच्या विळख्यात सापडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारीचा भार ज्यांच्या खांद्यावर आहे, असे कोरोना योद्धाच आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

राहुरीच्या कारागृहातील 37 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापाठोपाठ आठ- दहा दिवसात कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी आजारी पडू लागले.

चार दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळले. मागील दोन दिवसात आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

सध्या बारा जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. राहुल पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या होणे गरजेचे आहे.

अन्यथा, एखाद्या कर्मचार्‍याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे. जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देऊनही, वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी करीत नाहीत. असा सूर पोलिस वर्तुळात उमटू लागला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment