Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingLifestyleMaharashtraPolitics

1 ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक काल शांततेत पार पडली आहे.

आता या निवडणुकीनंतर नंतर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाईन पध्दतीनेच सभा होणार आहे. मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती.

आता पुन्हा सभा काढण्यात आली आहे. मात्र, मागील वेळेस राबविण्यात आलेली आयुक्तांकडे नावे व कागदपत्रे सादर करण्याची पध्दत यावेळी राबविणार का,

याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान स्वीकृत सदस्य निवडीत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजपचा 1 सदस्य असे 5 सदस्य निवडले जाणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button