मोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मांडओहळ धरणापासून पुढे वाहणा-या मांडओहळ नदीपात्रात वासुंदे येथील ठाकरवाडी येथे गणेश दहीफळे याचा मृतदेह नुकताच आढळून आला आहे.

गणेश ज्या ठिकाणी पाण्यात पडला तेथील डोहाचे पात्र अतिशय खोल असून तो तेथेच बुडाला असावा या शक्यतेने गेल्या तिन दिवसांपासून डोहामध्येच गणेश याचा शोध घेण्यात येत होता. एनडीआरएफच्या प्रशिक्षित जवानांनीही सहा तास अथक प्रयत्न करूनही शोध न लागल्याने गणेश याच्याविषयी शंका उपस्थित करण्यात येउ लागल्या होत्या.

गणेश पुढे वाहून गेला असावा या शक्यतने नदीपात्राच्या पुढील भागात शोध न घेण्यात आला नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या वेळी कदाचित गणेश याचा मृतदेह फुगून पाण्याबाहेर आला असावा व तो प्रवाहात पुढे वाहून गेला असावा अशी शक्यताही वर्तविण्यात येत होती.

एनडीआरएफच्या पथकाने सहा तासांचे अथक परिश्रम घेउनही रेल्वे पोलिस गणेश दहिफळे यांचा शोध न लागल्याने तिस-या दिवशी 48 तासानंतर शोध मोहिम थांबविण्यात आल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले होते. डोहात बुडालेला मृतदेह नैसर्गिकरित्या वर येण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता.

परिणामी शोध मोहिमेत वारंवार अडचणी येत होत्या. 18 जनांचे पथक अथक प्रयत्न करीत असताना बाजून असलेल्या कपा-यांमुळे त्यात सिलेंडर अडकण्याचा धोका होता. खोल डोहामध्ये जाउन पानबुडे शोध घेत असताना एका पाणबुडयाचा संपर्क काही काळासाठी तुटलाही होता.

इतर पाणबुडयांनी त्यास वर काढले. त्यानंतर पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली मात्र यश न आल्याने मोहिम थांबविण्यात आल्याचे तहसिलदार देवरे यांनी सांगितले. आता प्रशासनाच्या वतीने डोहाकडे लक्ष ठेवण्यात येणार असून गणेश याचा मृतदेह फुगून वर येण्याची वाट पाहणे इतकाच शेवटचा पर्याय शिल्लक राहिलेला

सर्व प्रयत्न करूनही यश न आल्याने तहसिलदार देवरे यांनी दुःख व्यक्त केले होते. मोहिम थांबवून एनडीआरएफची टीम परतत असतानाच ठाकरवाडी येथून प्रशासनास संपर्क करण्यात येउन मृतदेह आढळून आल्याची माहीती देण्यात आली. त्यानुसार प्रशासनाचे अधिकारी तिकडे रवाना झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment