ब्रेकिंग : मुकुंदनगर येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  मुकुंद नगर येथील काही जण नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पोहण्यासाठी  गेले होते.

मात्र यातील एक तरुण पोहत असताना अचानक बुडला. एक जण पाण्यात बुडल्याची माहिती आजूबाजूच्या परिसरात कळताच,स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .

परिसरातील काही निष्णात पोहणाऱ्यांनी तब्बल एक ते दीड तास संबंधित युवकाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलात दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment