नगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी, तुमच्या भागात मोकाट कुत्रे असतील तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील एजन्सीची महापालिकेने नेमणूक केली.

कुत्र्यांबाबत माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे क्रमांक जाहीर करून संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. नगरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. काही लहान मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. बोल्हेगाव परिसरातील वृद्धेवर दोन महिन्यांपूर्वी कुत्र्यांनी हल्ला केला होता.

नगरसेवक कुमार वाकळे यांनी कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्याची मागणी केली होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर महापालिकेने कुत्रे पकडण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली.

पिंपरी चिंचवड येथील पीपल फाॅर अॅनिमल या संस्थेला या कामाचा ठेका दिला आहे. एजन्सीमार्फत मोकाट कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण करणे, लसीकरण व औषधोपचार केले जाणार आहेत.

नागरिकांनी महापालिकेचे डाॅग इन्चार्ज पी. व्ही रामदिन ९५६१००४६६९, व्ही. व्ही. माने ७३८५०८४५४५ व कोंडवाडा विभागाच्या ८२०८३३११८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment