अनुभवाचा अभाव म्हणत आ. रोहित पवारांची केंद्रवार टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राजकारणात अतिशय सक्रिय असलेले कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत कडवी टीका केली आहे.

दीर्घकाळ चालणारे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी सक्रिय धरॊनांची आवश्यकता आहे.

मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारकडून यास प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने देशात लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. या निर्णय मुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला. आता हीच अर्थव्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी सक्षम व धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

तसेच कोरोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणामकारण धोरण आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे,

उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आले आहे, देशाचा जीडीपीहीघसरला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बेरोजगारीचा प्रश्न वेगानं पुढे येताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने सकारात्मक पाऊले उचलणे गरजेचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment