सुटी सिगारेट व बिडी विकायला राज्यात बंदी! ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे. यापुढे सिगरेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे. 

कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने

सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते.

परंतु, एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान 24 सप्टेंबरपासूच राज्यातील कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘ ई- सिगारेटवरही बंदी केंद्र सरकारने याआधी ‘ई-सिगारेट’चे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 19 सप्टेंबर 2019 रोजी या निर्णयाची घोषणा केली होती.

धूम्रपान रोखण्यासाठीचा पर्याय म्हणून ‘ई-सिगारेट’कडे पाहिले जात होते; परंतु, त्यात अपयश आल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment