Ahmednagar NewsBreakingCorona Virus Marathi NewsIndiaLifestyleMaharashtraPolitics

साई मंदिर उघडण्यासाठी संस्थानचे अधिकारी ‘येथे’ गेले अभ्यास दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे.

परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. नुकतेच मंदिर खुले करण्यात यावे यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामस्थांनी आंदोलन केले.

याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकारी तिरुपती येथे रवाना झाले आहेत.

तेथे तिरुपती संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे,

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह इतर पदाधिकारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक करून तिरूपती बालाजी येथे शुक्रवारी सायंकाळी पोहचले.

त्यांनी पद्मावती मंदीरापासून ते बालाजी मंदीरापर्यत पहाणी केली असून या पहाणी दौर्‍यात सुरक्षा यंत्रणा, दर्शनरांगेत भाविकांसाठी सोशल डिस्टसिंग तसेच टाईम दर्शन यासंदर्भात अभ्यास करणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

दरम्यान, मंदिर उघडण्याच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांकरिता तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी व कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल यांच्यासमवेत दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी बैठक पार पडली होती.

या बैठकीस तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल, उपकार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे,

प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले व बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाय-योजनांबाबत चर्चा करून काही सूचनाही त्यांनी केल्या होत्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button