‘ते’ अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्यात जुलै २०१७ पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणिक अर्हता नसलेले स्वतःला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत.

ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे,

अशी मागणी महाराष्ट्र पॅरामेडिकल काैन्सिलचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी म्हणाले, ज्यांच्याजवळ अधिकृत पॅरावैद्यक शैक्षणिक पात्रता नाही व पॅरावैद्यक परिषद रजिस्ट्रेशन नसताना व्यवसाय करत आहे

त्याच्या बाबतची तक्रार प्राप्त करण्याचे अधिकार त्या त्या विभागातील स्थानिय स्वराज्य संस्थांकडे असतात. महाराष्ट्र पॅरावैदक परिषदेस कलम

२(घ) (ज) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पॅरावैदक अहर्ता तपासुन नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्राप्त आहेत. परिषदेस अशा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या नावासह तक्रार प्राप्त होणे आवश्यक आहे.

अशा अनधिकृत व्यावसायिक व्यक्तिंची स्थानिय स्वराज्य संस्थांकडून चौकशी होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यास संबंधितावर पॅरावैद्यक परिषद कायद्याच्या कलम ३०,३१,३२ प्रमाणे कारवाई होईल.

पाथर्डी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असे अनेक शैक्षणिक अर्हता नसलेले लोक आहेत त्यांच्याकडे पदवी नाही पण ते नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळत आहेत.

त्यांचे ठरावीक डॉक्टरांशी असलेले आर्थिक संबंध आणि हवे तसे रिपोर्टस देण्याची मागणी यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment