‘ ‘त्या’ अभियंत्यास पदोन्नती देणाऱ्यांवर कारवाई करा’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात शेख यांनी म्हटले आहे, महापालिकेचे अभियंता बल्लाळ यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यांना पदोन्नती देणारे अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश

नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी 22 सप्टेंबर रोजी दिलेला आहे. परंतु यावर कार्यवाही होताना दिसत नाही. बल्लाळ यांच्याविरोधात नगरविकास खात्याकडे अनेक तक्रारी दाखल असताना

बल्लाळ यांना विद्युत विभागातून नगररचना विभागाच्या उपअभियंतापदी नियुक्ती देण्यात आली असून, शासनाच्या आदेशाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment