VI देत आहे 1 जीबी विनामूल्य डेटा ; तुम्हाला मिळालाय का? ‘असा’ करा चेक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत.

सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या यांच्यात संघर्ष सुरु आहे. आता व्होडाफोन-आयडिया टेलिकॉम कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 1 जीबी डेटा विनामूल्य देत आहे. विशेष गोष्ट अशी आहे की हा डेटा आठवड्यातून कधीही वापरला जाऊ शकतो.

 ग्राहकांना 1 जीबी 4 जी डेटा विनामूल्य मिळतो :- कंपनी सतत आपले युजर्स गमावत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी विनामूल्य डेटा देणे चांगले पाऊल ठरू शकते. टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी आपल्या विद्यमान ग्राहकांना प्रमोशनल ऑफर अंतर्गत विनामूल्य 1 जीबी 4 जी डेटा ऑफर करत आहे.

विनामूल्य डेटाची वैधता 7 दिवस आहे. जर युजर्सने एका आठवड्यात हा डेटा वापरला नाही तर त्याचा कालावधी कालबाह्य होईल.

 विनामूल्य डेटा प्राप्त झाला आहे की नाही ते ‘असे’ तपासा :- निवडक ग्राहकांना सध्या विनामूल्य डेटा दिला जात आहे. ज्या सर्व वापरकर्त्यांना डेटा देण्यात आला आहे त्यांना एसएमएसद्वारेही सांगितले गेले आहे. आपल्याला विनामूल्य डेटा मिळाला आहे की नाही हे आपण तपासू इच्छित असल्यास फोनमध्ये Vi अॅप घ्या. लॉग इन केल्यानंतर, एक्‍ट‍िव पॅकच्या तपशीलांवर जा. विनामूल्य डेटा प्राप्त झाला की नाही हे येथे आपल्याला डेटा पॅकमध्ये कळेल.

 व्हीआयने आणले आहेत ‘हे’ प्लॅन्स :- व्हीआयने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी पाच प्री-पेड योजना सादर केल्या आहेत. त्यात त्यांना जी – 5 प्रीमियम सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य सदस्यता मिळत आहे. 355 रुपयांच्या व्होडाफोन आयडिया योजनेत तुम्हाला एका वर्षासाठी जी 5 प्रीमियमची सदस्यता मिळेल.

या योजनेत 50 जीबी डेटा उपलब्ध असेल. या योजनेत कोणतीही कॉलिंग सुविधा उपलब्ध नाही. या योजनेची वैधता 28 दिवस आहे. त्याचबरोबर, कंपनीची 405 रुपयांचाही एक प्लान आहे. ज्यामध्ये जी 5 प्रीमियमची एका वर्षासाठी विनामूल्य सदस्यता मिळेल.

तसेच यात एकूण 90 जीबी डेटा उपलब्ध असेल. या योजनेत अमर्यादित कॉलिंग देण्यात येत आहे. या दोन योजनांशिवाय तुम्हाला 595 रुपये, 795 रुपये आणि 2,595 रुपयांच्या योजनेत तुम्हाला 1 वर्षाची जी5 ची मोफत सदस्यता मिळेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment