नोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- समाजात नोकरीला लावून देतो असे सांगत फसवणूक करण्याचे प्रमाण मोठे आहे. असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असतात.

अशीच एक फसवणुकीची घटना अहमदनगर मध्ये घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर आण्णासाहेब घाडगे असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून कोरोना काळात आरोग्य खात्यात नोकरीला लावून देतो असं सांगत त्याच्याकडून 4 लाख उकळले होते.

सोमनाथ सहादु पातकळ, माहेश्‍वरी ऊर्फ राणी सोमनाथ पातकळ (हल्ली रा. गजानन कॉलनी, नागापूर, मुळ रा. चापडगाव ता. शेवगाव), शरद एकनाथ ढिसले (रा. कर्‍हे टाकळी ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहेत.

तरूणाचे मामा योगेश भाऊसाहेब गुडघे (वय- 36 रा. बोल्हेगाव फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. सागरला आरोग्य खात्यामध्ये नोकरीला लावून देतो असे आरोपी यांनी योगेश गुडघे यांना अमिष दाखविले.

या अमिषाला बळी पडून योगेश यांनी 16 मे पासून वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात आरोपी यांना चार लाख रूपये दिले. सागरला आरोग्य खात्यामध्ये नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे योगेश यांच्या लक्षात आले. याप्रकरणी तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment