‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- काही दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. तिचे राज्य शासनाच्याविरोधात असणारे भडक वक्तव्यामुळे ती टीकेची धनी बनली.

परंतु तिने आता नुकतेच याची परिसीमा गाठली. शेतकर्‍यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. त्यामुळे शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा आरोप करत तिच्याविरुद्ध कर्नाटकच्या तुमकूरमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये कृषी विधेयकांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचा अपमान केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकतीच तीन कृषी विषयक विधेयके मंजूर करून घेण्यात

आल्यानंतर विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. असं असतानाच कंगनानं ट्विट करून या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर आपण शेतकर्‍यांना दहशतवादी म्हटलेच नसल्याचे स्पष्टीकरण कंगनाने दिले होते.

काय म्हणाली होती कंगना? :- ‘पंतप्रधान मोदीजी, जे झोपले आहेत त्यांना जागे करता येईल. पण जे झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना कसे जागे करणार? तुम्ही कितीही समजवून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे?

हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले गेले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीचे नागरिकत्व कायद्याने हिरावले गेले नाहीय.’

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment