Ahmednagar NewsMaharashtraPolitics

‘मुख्यमंत्रीसाहेब एवढं करा, पुढील काळात आपल्या बाजूने उभा राहील’ अहमदनगरच्या कामगाराचे थेट ठाकरेंना पत्र

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ‘केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे असा आरोप कामगारांमधून केला जात आहे. त्यामुळे याच्या विरोधात अनेक अंडोने झाली. अहमदनगरमध्येही आंदोलने झाली. मात्र, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही. तरी राज्य सरकारनं पुढाकार घेऊन किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये,

अशी विनंती करणारं पत्र एका अहमदनगरच्या कामगारानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. तुषार बाळासाहेब सोनवणे असे या कामगाराचे नाव असून ते नगरच्या औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करतात.

काय लिहिले आहे पत्रामध्ये?: – केंद्र सरकार “कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक” लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे. आधीच कायदे कामगारांचे बाजूचे नसताना आता नवीन कामगार सुधारक विधेयक पारित करून सरकार कामगारांना कंपनी व्यवस्थापन व मालकांच्या हाताचे

बाहुले बनवू इच्छित आहे काय? हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर कारखाना व्यवस्थापक कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील, कामगारांची मुस्कटदाबी होईल, तसेच कामगारांना आपले हक्क अधिकार मागता येणार नाहीत. आज कामगार संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहे

त्याला पुढील काळात संघटित होता येणार नाही. ज्या बोटावर मोजण्या इतक्या प्रामाणिक कामगार संघटना आहेत त्या मोडीत निघतील मी एक सर्वसामान्य कामगार आपणास आग्रहाची विनंती करीत आहे की जर केंद्र सरकारने कायदा अमलात आणला,

लागू केला तर आपण हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.’ जर जनतेला आपण असे आश्वासन दिले तर पुढील काळात सर्वसामान्य गोरगरीब कामगार हा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील.’

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button