Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

पाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- वसंत टेकडी येथील मुख्य पाईपलाईनला शनिवारी मध्यरात्री गळती लागल्याने रविवारी पहाटेपर्यंत जवळच असलेल्या संदेशनगर वसाहतीत अक्षरश: घरा-दरांत पाणीच पाणी साचले अनेकांना मध्यरात्री पाऊस झाला असावा व हे पाणी आले असे वाटले.

रविवारी सकाळी टाकीजवळच राहणार्‍या नागरिकांनी पाणी कोठून येते हे शोधत असतांनाच मुख्य पाईपलाईन फुटल्याचे दिसले.

तातडीने या वसाहतीत राहणारे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घातले. वसंत टेकडी येथे जाऊन श्री.त्र्यंबके यांनी मुख्य पाईपलाईनची पाहणी करुन मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आले.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना माहिती दिली. त्यांनी संबंधितांना सूचना करुन पाणी उपसा बंद करण्यास सांगितल्यानंतर गळती थांबली.

शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास पाईपलाईन फुटली रविवारी सकाळी पाणी बंद होईपर्यंत संदेशनगरमधील नागरिकांच्या घरात-दारात पाण्याचे तळे साचले.

नगरसेवक त्र्यंबके यांनी घरातून पाणी काढण्यासाठी स्वत: नागरिकांना मदत केली. तातडीने लक्ष घातल्याने पाणी बंद करता आले. दुपारपर्यंत दुरुस्ती होऊन पूर्ववत पाणी उपसा सुरु झाल्याचे समजते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button