कोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यात ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस प्रगतीपथावर असून लवकरच ती उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला यांनी शनिवारी कोरोना व्हायरस लसी संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत सरकारला एक मोठा प्रश्न विचारला. सर्व भारतीयांना कोरोना लस लागू करण्यासाठी सुमारे 80 हजार कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे पूनावाला यांनी सांगितले आहे.

देशातील सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरकारला विचारले की देशात प्रत्येकाला कोरोना लस देण्यासाठी 80 हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत का? पंतप्रधान कार्यालयालाही हे स्टेटमेंट टॅग करत त्यांनी हे एक आव्हान असल्याचे म्हटले आहे.

अदार पूनावाला यांनी शनिवारी ट्वीट केले की कोरोना लस खरेदी करण्यासाठी आणि ती भारतीयांना दिली जाण्यासाठी पुढील एका वर्षात 80 हजार कोटी रुपये लागतील. त्यांनी भारत सरकारला विचारले आहे की आपल्याकडे पुढील एक वर्षात कोविड -19 लसीसाठी एवढी मोठी रक्कम उपलब्ध आहे का?

कोरोनाची लस तयार करण्यासाठी सीरम संस्थेने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, यूके मधील AstraZeneca आणि अमेरिकन कंपनी Novavax सोबत भागीदारी केली आहे. आदर पूनावाला यांनी ट्वीट करून लिहिले आहे, “Quick question”, भारत सरकारला पुढील एका वर्षात 80 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील का?

कारण लस विकत घेण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयापर्यंत नेण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला इतके पैसे लागतील. हे आपल्यापुढे आव्हान आहे. त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले की मी हा प्रश्न उपस्थित केला आहे कारण आपल्याकडे भारत आणि जगातील लस उत्पादकांना योजना बनवून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी, पूनावाला म्हणाले होते की वर्ष 2024 अखेरीस जगातील प्रत्येकजणास कोरोना लस मिळू शकेल. त्यांच्या मते, सर्व लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचण्यास कमीत कमी चार ते पाच वर्षे लागतील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment