‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. शेतकऱ्यांचे उत्पादन देणारे पीक कांदाही मागील काही दिवसांत 3-7 रुपये प्रति किलो होता.

परंतु आता कुठे कांद्यास चांगला भाव मिळू लागला असतानाच मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा झाला आहे. चार पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय असा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे. प्रतिक्विंटल 3 हजार रुपयांपर्यंत गेलेले भाव प्रतिक्विंटल 1 हजारापर्यंत खाली आले.

लॉकडाऊन काळामध्ये कांदा विकायचा कोठे हा प्रश्न होता. काहीबाही मार्ग काढून कांदा विकला तो 600 ते 700 रुपये प्रतिक्विंटलने बाजारभावाची अपेक्षा असणारांनी मात्र कांदा साठवून ठेवला. याच कांद्याला आता बाजारभाव आले आणि केंद्राने निर्यातबंदी करून शेतकर्‍यांवर संकटाची कुर्‍हाड चालविली.

आर्थिक संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्याची सारी भिस्त साठविलेल्या उन्हाळी कांद्यावर असताना केंद्र सरकारने शेतकर्‍यांना कायदेशीर निर्यातबंदीचा ठेंगा दाखविला. सध्या उपलब्ध असलेला कांदा 40 टक्क्यांपर्यंत सडला आहे. वजनातही 50 टक्केपर्यंत घट झालेली.

सारी हिशोबाची गोळाबेरीज आणि नुकसान, घट लक्षात घेता पोटच्या पोराप्रमाणे जपलेला कांदा 2 हजार ते 3 हजार प्रतिक्विंटलने विकला गेला म्हणजे फार काही पदरात पडले असे नाही. मार्चपासून ऑगस्टच्या अखेरीपर्यंत बाजारभाव 1 हजाराच्या दरम्यानच होते.सप्टेंबर महिन्यातल्या बारा तेरा दिवसांत ते वाढले आणि तातडीने कांद्याची निर्यातबंदी झाली.

जीवनावश्यक कायद्यातून मुक्त झालेला कांदा निर्यातबंदीच्या कायद्यात अडकविण्याची सरकारी मनीषा यापुढेही असणारच आहे. भविष्यात बिहारची निवडणूक आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सुशांत, कंगना, रिया हे आघाडीवर आहेत. बिहारचा आणि देशातीलही शहरी मतदारही खुश व्हावा आणि ही निवडणूक सोपी जावी असाही उद्देश केंद्र सरकारचा असू शकतो.

या कारणानेही कदाचित केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या मानगुटीवर बसले असेल अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गामधून येऊ लागल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment