फटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- विस्‍फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2020 दिपावली सणानिमित्‍त तात्‍पुरते शोभेची दारु (फटाके) विक्रीचे परवाने घेणे आवश्यक असून त्यासाठी विहित पद्धतीने सर्व बाबींची पुर्तता करूनच दिनांक 31 ऑक्‍टोबर 2020 पूर्वी ज्‍या त्‍या तालुक्‍याच्‍या त‍हसिल कार्यालयात अर्ज सादर करावे, 

असे आवाहन जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे. परवाना देण्यासाठी खालील पद्धती अवलंबण्यात येणार आहेत. अर्ज विहीत नमुना फॉर्म नं ए.ई.5 मध्‍ये करणे. अर्ज संबंधित तालुक्‍याच्‍या तहसिल कार्यालयात उपलब्‍ध राहील. अर्जास रु. 5  चे कोर्ट फी स्‍टॅम्‍प लावावे.

परवाना फी रु. पाचशे रुपये,  परवाना फॉर्म नं. एल.ई-5 साठी अॅडमिनीस्‍ट्रेटिव्‍ह सर्व्हिसेस रिसीट अंडर एक्‍सप्‍लोझिव्‍ह अॅक्‍ट आदर कलेक्‍शन 0070 ओ.ए.एस या शिर्षकाखली संगणक क्र. 0070008101 खालील स्‍टेट बँकेत चलनाने भरावी व चलनाची मुळ प्रत अर्जासोबत जोडुन पाठवावी.

परवाना फी चे चलन तहसिल कार्यालयातुन मंजुर करुन घेऊन तालुका ठिकाणचे स्‍टेट बँकेत भरता येतील. ज्‍या जागेत फटाका स्‍टॉल उभारावयाचा आहे त्‍या ठिकाणचा नकाशा त्‍यावर संबंधीत पोलिस निरीक्षक यांनी जागा सुरक्षिततेच्‍या दृष्टिने तपासणी करुन तशी स्‍वाक्षरी करुन नाहरकत दाखला सादर करावा.

स्टॅालग्रामपंचायत हद्दीत असेल तर ग्रामपंचायतीचा दाखला अथवा महानगरपालिका हद्दीत असल्‍यास महानगरपालिकेची शिफारस तसेच नगरपालिका हद्दीत असन्‍यास नगरपालिकेची शिफारस तसेच छावणी हद्दीत असल्‍यास छावणी कार्यकारी अधिकारी मंडळ यांची शिफारस जोडावी. नियोजित जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असावी,

नसल्‍यास सक्षम अधिका-याची तात्‍पुरती उक्‍त प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी घेऊन सादर करावी. परवाना धारकाविरुध्‍द फौजदारी प्रक्रिया संहितेच्‍या प्रकरण 8 नुसार मागील 10 वर्षात गुन्‍हा दाखल होऊन त्‍यास शिक्षा झाली नसल्‍याबाबत तसेच अर्जदारास तात्‍पुरता फटाका परवाना

देण्‍यात यावा किंवा कसे याबाबत स्‍पष्‍ट अभिप्रायासह सक्षम अधिकारी यांचा दाखला प्रकरणी सादर करावा. स्‍फोटक पदार्थाचा नियम 2008 प्रमाणे परवाना धारकाने त्‍यांचे व्‍यवसाया संबंधीचे हिशोब व्‍यवस्थित ठेवणे आवश्‍यक आहे. अशा सुचना प्रत्‍येक परवान्‍याच्‍या अटीमध्‍ये दर्शविलेल्‍या आहेत. त्‍याप्रमाणे ज्‍यांना परवाना पाहिजे त्‍यांनी मागील वर्षाचे परवाना व हिशोबाची माहिती अर्जासोबत सादर करावी.

तसेच परवाना फी रू. 500/- शासकिय खजिन्‍यात जमा केले म्‍हणजे परवाना मिळाला हे ग्राह्य धरू नये. वरीलप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता करूनच दिनांक 31 ऑक्‍टोबर 2020 पूर्वी ज्‍या त्‍या तालुक्‍याच्‍या त‍हसिल कार्यालयात अर्ज सादर करावेत व परवाना तयार झालेनंतर तेथुनच परवाना घेऊन जावे.

सर्व संबंधीत तहसिल कार्यालयात वरील बाबींची पुर्तता पाहुनच परिपुर्ण प्रकरण जिल्‍हादंडाधिकारी कार्यालयात सादर करुन प्रकरण पूर्ण झाल्‍यानंतर अर्जदारास मुदतीत परवाना देण्‍याची जबाबदारी त्‍यांचेवरच राहील. अपूर्ण प्रकरण स्‍वीकारले जाणार नाही किंवा चुकुन प्राप्‍त झाल्‍यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्जदार यांनी आपआपल्‍या तालुक्‍यातील प्रस्‍ताव सादर करावेत व तेथुनच घेऊन जावे, असे कळविण्यात आले आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment