सहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता भाऊसाहेब गोविंद पगारे याने चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी की, जामगाव येथील कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शन साठी कोटेशन भरले होते मात्र,

कोटेशन मंजूर होऊनही सहाय्यक अभियंता पगारे यांनी केवळ पैशासाठी मिटर दिले नाही. त्यामुळे मीटरच्या मागणीसाठी कैलास शिंदे यांनी आज पगारे यांची भेट घेतली.

त्यावेळी मिटर देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी पगारे यांनी शिंदे यांच्याकडे केली होती. यावर हा व्यवहार चार हजार रुपयांवर ठरला.

कैलास शिंदे यांनी नगरमधील लाचलुचपत विभागाला ही माहिती दिल्यानंतर पथक भाळवणीच्या वीज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयात दाखल झाले.

त्यावेळी सहाय्यक अभियंता पगारे याला चार हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. गुन्हा नोंदविण्याचे काम काम अद्याप सुरू आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment