Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

पत्नीला पाठवले नाही म्हणून पेट्रोल ओतत आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पत्नीला आपल्याबरोबर परत पाठवले नाही, म्हणून सासू-सासऱ्यांवरील रागाच्या भरात स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत गणपत दगडू पवार (शिर्डी) याने नेवासे पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची चौकशी करता पवारने सागितले, मी व माझी पत्नी सारिका २६ सप्टेंबरला तिच्या माहेरी गोगलगाव येथे भेटण्यासाठी आलो होतो.

पत्नीला परत आणण्यासाठी रविवारी गोगलगाव येथे गेलाे असता सासू-सासरे म्हणाले, आज तुझ्या पत्नीला नेऊ नको, नंतर घेऊन जा. त्यावरुन वाद झाला. पत्नीस पाठवले नाही,

या रागातून मी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने काही काळ खळबळ उडाली होती. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गिते करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button