Ahmednagar News

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत मुंबई पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार दि. 8 ऑक्‍टोबर 2020 रोजीचे मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.

दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे. कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा.

देणे, गाणे म्हणणे, वादय वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरणसंच वापरणे किंवा वाजवणे, सभ्‍यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे आवेशपूर्ण भाषणे करणे,

हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर क्स्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस मिरवणूका काढणे आणि पाच पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे आदेश खालील व्‍यक्‍तीस आदेश लागु होणार नाही. यामध्ये,शासकीय सेवेतील व्यक्‍तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

प्रेतयात्रा/अंत्यविधीस सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन जास्तीत-जास्त 20 व्यक्तींची उपस्थिती. लग्नसमारंभ सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन जास्तीत-जास्त 50 व्यक्‍तींची उपस्थिती. तसेच उपरोक्त नमूद कालावधीकरीता

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अन्वये वेळोवेळी निर्गमित होणारे प्रतिबंधात्मक आदेशात सवलत दिलेल्या बाबींस / व्यक्‍तींस लागु होणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button