भाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज भेट देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आ.पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके,

नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनमाळी यांच्यासह डॉ.प्रकाश भंडारी, सतीश पाटील यांचा तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर

व युवक अध्यक्ष नितीन धांडे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाने माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच हादरा बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment