झाडावर धडकून आयशर चालक ठार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- संगमनेरकडून लोणीकडे येणाऱ्या आयशर टेम्पो निमगावजाळी जवळ असणाऱ्या हॉटेल तरंगच्यापुढे चिंचेच्या झाडावर धडकून टेम्पो चालक ठार झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, बळीराम राम मोरे, वय ६० वर्ष, रा. निगडी, जि. पुणे याच्या विरोधात आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरकडून लोणीकडे येत असताना आयशर टेम्पो क्र. एमएच १४ बीजे १०४५ हा भरधाव वेगाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन रॉंग साईडला जावून रोडच्या कडेला असलेल्या

चिंचेच्या झाडाच्या खोडास जोरदार धडक मारल्याने यातील आयशर चालक बळीराम राम मोरे (वय ६० रा. निगडी) हे ठार झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोनि मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पारधी हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment