पहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  अनेकदा काही बहुचर्चित अतिक्रमणे दिवस ढवळ्या पडण्यास अडचणी येत असतात.

यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रीच्या अंधारात या कारवाई करून मोकळे होतात. मात्र अशीच एक कारवाई आता चर्चेत आली आहे.

राहता शहरातील ईदगाह मैदानालगत असलेल्या बाळासाहेब विखे-पाटील उर्दू शाळेचे बांधकाम पाडण्यास संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता अथवा शाळेच्या संचालक मंडळाला बचाव कार्याची संधी न देता

राहता नगरपालिका प्रशासनाने पहाटे पाच वाजेच्या सुमारास चार शाळा खोल्या जमीनदोस्त केल्या आहे, सदरील प्रकरणाची सखोल चौकशी होऊन

कडक कारवाई करण्याची मागणी समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने राहता तहसील कार्यालय येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, सदर बांधकाम पाडत असताना शाळेत लावलेले महापुरुषांचे फोटो आणि महापुरुषांचे सुविचार असलेले फलक देखील तोडण्यात आले ही एक प्रकारची विटंबना आहे.

सदरील बांधकाम पडण्याच्या आगोदर राहता प्रशासनाने शाळा स्थलांतरीत अथवा पुनर्वसन करण्यासंदर्भात पर्यायी सहकार्य करायला हवे होते. कोणालाही विश्वासात न घेता हे बांधकाम पाडणे एक कट कारस्थान असल्याचे उघड होते.

म्हणून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करण्याची मागणी समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment