Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१४२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये महापालिका शेत्रतील ०५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०७ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७१,

अकोले ०३, जामखेड ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १३, नेवासा ०६, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर १७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१,  श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कोपरगाव २०, नगर ग्रामीण १६, नेवासा २४, पाथर्डी २४, राहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १६०, अकोले ३७, जामखेड ४२, कर्जत १९,  कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४२, नेवासा ३६, पारनेर २९, पाथर्डी ३०, राहाता ६८, राहुरी ४३, संगमनेर ५१, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ५५, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३,इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:३९५६२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४१४२
  • मृत्यू:७२४
  • एकूण रूग्ण संख्या:४४४२८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button