भाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- भाजप सरकारच्या काळात ‘रोजगार व स्वयंरोजगार’ या विभागाचे नामकरण ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ असे करण्यात आले होते. परंतु आता महाविकास आघाडी सरकारने हे नामकरण बदलले आहे.

त्यांनी पुन्हा ‘रोजगार’ हा शब्द आणला आहे. परंतु ही उठाठेव करून रोजगार निर्माण होईल का असाही प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.

या विभागाच्या नावात रोजगार शब्दच नसल्याने रोजगार व स्वयंरोजगाराशी संबंधित विभाग कोणता? असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यामुळे या विभागाचे नाव आता ‘कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग’ असे करण्यात आल्याचे स्पष्टीकरण आता देण्यात आले आहे.आता या विभागाचा नामविस्तार करून त्यामध्ये रोजगार हा शब्द आणला आहे.

त्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाली. भाजपने जेव्हा नाव बदलले तेव्हा रोजगाराची जबाबदारी सरकार झटकत असल्याची टीका झाली होती.

त्या पार्श्वभूमिवर आघाडी सरकारने किमान विभागाच्या नावात तरी पुन्हा रोजगार आणला आहे. एके काली खूप महत्व असलेला हा विभाग नोकरीचे स्वरूप आणि प्रमाण बदलत गेल्याने महत्वहीन झाला होता. परंतु आता सरकारच्या या बदलामुळे रोजगार उपलब्ध होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment