मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक ; शिवसेना खासदारांची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मशाल पेटलेली असून सकल मराठा समाज बांधव यासाठी आक्रमक झाले आहे. 

याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे देखील मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक असून साठी पाठिंबा दिला आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने येथील मराठा तरुणांनी सत्कार केला.

त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत शिवसेना सकारात्मक असुन मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वतः भक्कमपणे मांडणार असल्याची, ग्वाही खासदार सदाशिव लोंखडे यांनी दिली.

आरक्षणाचा तोडगा निघेपर्यंत पोलिस भरतीला स्थगिती द्यावी, केंद्राने मराठा समाजाला दिलेले आरक्षण समाजाला मान्य नसल्याचे मराठा तरुणांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार आहे. तसेच इतर

समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे सध्या कुणीही आरक्षणावरुन राजकारण करु नये, राजकीय टोला खासदार लोखंडे लगावला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment