अखेर जिल्हा पोलिस अधीक्षकांची नगरमध्ये एंट्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्याचे तत्कालिन एसपी अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षकपदी मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान एसपी साहेब मनोज पाटील यांची नुकतीच नगरमध्ये एंट्री झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पाटील यापूर्वी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

काही दिवसांपूर्वी त्यांची नियुक्ती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली. मनोज गोविंद पाटील हे आयपीएस 1991 बॅचचे अधिकारी आहे.

यांना त्यांच्या गुणवंत सेवेबद्दल संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाकडून प्रतिष्ठित अध्यक्ष पदक मिळाले आहे. नुतन एसपी नगरमध्ये आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी त्यांचे स्वागत केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment