राहुल यांच्या अटकेचा नगरमध्ये निषेध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- हाथरस येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की आणि अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे निदर्शने केली.

यूपी सरकार हाय-हाय, योगी सरकार हटाव, देश बचाव अशा घोषणा देत आंदोलन केले. राहुल गांधी हे हाथरस येथे अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार होते.

यावेळी उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले होते. यावेळी राहुल यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचा निषेध म्हणून नगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे जमा होऊन निदर्शने केली.

दरम्यन हे आंदोलन सुरू असताना पोलीस दाखल झाले आणि त्यांनी निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेसच्या आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले.

यावेळी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मयुर पाटोळे, युवक काँग्रेसचे उपशहर जिल्हाध्यक्ष गणेश भोसले, एनएसयूआयचे शहराध्यक्ष दानिश शेख आदी उपस्थित होते .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment