मालट्रक घेऊन जाणार्‍या दोघांना अज्ञात तिघांनी लुटले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर महामार्गांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरु झाली आहे. मात्र आता मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून त्यांना लुटले जात असल्याचा प्रकार घडू लागले आहे.

नुकताच नगर मधील चास शिवारात असाच एक प्रकार घडला आहे. बिहार येथून पुण्याच्या दिशेने मालट्रक घेऊन जाणार्‍या दोघा भावांना तिघा चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी मारहाण करून लुटले.

नगर- पुणे रोडवरील चास शिवारात भारत पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. या मारहाणीत ट्रक चालक मनिष कुमार योगिंदर यादव (वय- 26 रा. बिहार) व त्याचा भाऊ असे जखमी झाले आहेत.

रस्तालुटमार करणार्‍या काही चोरट्याचे फोटो जखमी मनिष व त्याच्या भावाला दाखविले. त्यांच्या ओळखीवरून तिघांविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment