…तर मला मते कशामुळे पडतात हे कळत नाही -खासदार सुजय विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. खासदार, आमदार, नेतृत्व चुकत असेेल, तर बोलले पाहिजे. उद्देश पक्षवाढीचा असला पाहिजे,

कोणा एका व्यक्तीच्या वाढीचा नाही, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मनातील खदखद पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे अध्यक्षस्थानी होते. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे,

उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष वैजयंता दुधाडे, युवा मोर्चा अध्यक्ष विश्‍वास रोहकले, उषा जाधव आदी यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, माझी जिल्हाध्यक्षांना विनंती आहे, सहनशीलतेचा अंत पाहू नका.

बंडखोरी फार काळ दाबण्याचा प्रयत्न झाला, तर स्फोट होईल. ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्या सुधारा. सर्वांना न्याय द्या. माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मी पक्षात जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो.

जुळवून घेण्याचा माझा मूळ स्वभाव नाही. कोणत्याही पक्षात मी जुळवून घेतलेले नाही. मी बंडखोर माणूस आहे. लोेकांना वाटत असेल मी उद्धट आहे, माझे वडीलही तसे म्हणतात.

असे असेल तर मला मते कशामुळे पडतात हे कळत नाही, असा सवाल विखे यांनी केला. मी पारदर्शक माणूस आहे. मी कधी लाचारी करत नाही.

सत्य तेच बोलतो, कधीही वेळकाढूपणा करत नाही. जे होणार नाही ते होऊ शकत नाही. पाहू करू, उद्या या हे धंदे मी करत नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment